Wikipedia

Search results

Sunday, 28 February 2021

*राष्ट्रीय विज्ञान दिन* दरवर्षी 28 फेब्रुवारीला


भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो याचे कारण 28  फेब्रुवारी हा दिवस भारतीयांना अभिमान वाटावा असा आहे डॉ.  सी .व्ही. रामन यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला .त्यांचा 

 *रामन इफेक्ट* हा शोध सादर करण्याचा दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी त्यांची ही कृती कायम भारतीयांनी लक्षात ठेवावी म्हणून हा दिवस *राष्ट्रीय विज्ञान दिन .* रामन इफेक्ट या संशोधनातील महत्त्वाचे निरीक्षण 28 फेब्रुवारी रोजी पहाटे झाले . *1986* सालापासून भारतभर हा  दिवस विविध वैज्ञानिक कार्यक्रमाद्वारे साजरा केला जातो . 

      एकाच रंगाचे प्रकाशकिरण विविध पदार्थांमधून नेले असता त्यांच्या लांबीत फरक पडतो .  हा फरक विविध पदार्थामध्ये असणाऱ्या रेणूंमुळे होतो शिवाय तो प्रकाश किरण आणि माध्यम यात ऊर्जेची देवाण घेवाण होते . असं संशोधन रामन यांनी केले होते गणित पद्धतीत मांडले यालाच " *रामन परिणाम "* म्हणतात . त्यांच्या शोधामुळे हजारो रसायनांची संरचना समजली . 1928 साली त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वैज्ञानिकांना या संशोधनाचे महत्त्व लक्षात आले आणि म्हणूनच 1930 साली त्यांना *नोबेल पुरस्काराने* गौरवण्यात आले . 

     स्वातंत्र्यपूर्व काळातील *रामन,* *रामानुजन , सत्येंद्रनाथ* *बोस,  मेघनाथ* *साह , होमी भाभा* यांनी लावलेले शोध त्याच्या संशोधकाच्या नावाने प्रसिद्ध झाले .स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञानप्रेमी पंतप्रधान नेहरू,  राजीव गांधी यांच्या प्रेरणेने होमी *भाभा भटनागर राजा रामण्णा ,* *सतीश धवन , यू आर* *राव . जयंत नारळीकर डॉ.* *वसंत गोवारीकर आणि डॉ.*  *ए.* *पी *.जे.* *अब्दुल** *कलाम अशा* समर्थ शास्त्रज्ञांच्या नेतृत्वामुळे देशात विज्ञान संस्थेचे जाळे पसरले .या शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळे आपण सर्वच क्षेत्रात भरारी घेऊन *महासत्ता* होण्याच्या पथावर आहे .भारतीय विज्ञानाचा आढावा घेतला तर विज्ञान जगतात *पाच* विशेष गोष्टी उल्लेखनीय आहेत त्या म्हणजे *मंगळयान , GSLV मार्क 1 ,* *GSLV मार्क 2 , व्हीट जिनोम* *सिक्वेन्स , परमाणू क्षेत्र* *उपलब्धता INS अरिहंत* *पाणबुडी*  त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने नावलौकिक प्राप्त केला आहे . 

       विज्ञानरूपी ज्ञान कधीही थांबत नाही . सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी *अन्न वस्त्र निवारा* यांच्या बरोबर *विज्ञानाची* गरज आहे .विद्यार्थ्यांनी फक्त *इंजिनीअर , डॉक्टर , आर्किटेक्ट* अशा स्वरूपाच्या झटपट श्रीमंतीच्या शाखांऐवजी *विज्ञान व संशोधनामध्ये रस* घ्यावा व पालकांनी सुद्धा मुलांची मानसिकता तयार करावी . संशोधकाला त्याच्या आवडीचे काम करता येते . इतर नोकऱ्यामध्ये हे जमत नाही संशोधकांच्या संशोधनाचा समाजाला निश्चितच फायदा आहे . ज्ञानमय , विज्ञानमय व्यक्तींचा समाजात सन्मान होतो ही व्यक्ती सर्वत्र आदरणीय बनते .

      आज देशासमोर *हवा , पाणी* व *जमीन यांचे प्रचंड* *प्रदूषण , तापमान वाढ ,* *जमिनीची धूप जंगलांचा*  *-हास ,बेबंद शहरीकरणाच्या* *समस्या . स्त्रीभ्रूण हत्या ,* *भविष्यातील इंधनाची कमतरता* *वाढत्या लोकसंख्येला* *लागणारे* *अन्नधान्य व पाणीसमस्या व पाणी* *प्रदूषण* अशा विविध संकटांनी ग्रासला आहे भविष्यात या समस्या तीव्र होणार आहेत या समस्यांचे निराकरण फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे करता येणार आहे . *विज्ञानाला व विज्ञान* *संशोधनाला पर्याय नाही* हे महत्त्व  विविध स्तरावर पटवून समाजात *विज्ञान विषयक* *जाणीव* वाढविण्यासाठी विज्ञानदिन साजरा केला जावा .

            साै. विजया राजेंद्र जाधव 

             छ. शिवाजी विद्यालय

                        दुधोंडी ( पलूस)

Sunday, 29 November 2020

संविधान दिन

 


स्पर्श वेडा

 *स्पर्श वेडा....*

👌👌👌👌👌👌🙏

त्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता.

आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले.

सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला.

रोज सकाळी उठून हा वेडा खाली धावायला आणि व्यायाम करायला जायचा. त्याचे मित्र मात्र आरामात उठायचे. सकाळी उशिरा उठूनही याच्या मित्रांची कामे आटोपता आटोपता त्यांना थोडा उशीर व्हायचा. हा मात्र सर्वात अगोदर गाडीत. स्वाभाविकपणे रोजच त्याला खिडकी जवळ जागा मिळायची. गाडी सुरू झाल्यावर तो कानात इअर फोन लावून एकतर fm ऐकायचा किंवा कोणातरी नातेवाईकांना किंवा गावच्या मित्रांना फोन लावायचा. त्याचे बाकीचे मित्र मात्र सोशल मिडीयाद्वारे आपल्या शेकडो मित्रांच्या संपर्कात यायचे. चहा, कॉफी, फुलं, गुलदस्ते, चॉकलेट आणि अजूनही खूप काही वाटायचे आणि तितकेच स्वीकारायचे.... किती छान ना.

हा वेडा मात्र गाणी ऐकत खिडकीतून रस्त्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे, वनराई बघायचा. पक्षी, प्राणी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघायचा. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने कधी डुलकी लागलीच तर छानशी झोपही घायचा. त्याला कंपनीने दिलेला रोजचा २ GB डेटा मात्र नेहमीच वाया घालवायचा, त्याचा मोबाईल नेहमी रिकामाच असायचा.

ना फुला-फळांचे, ना पक्षा प्राण्यांचे फोटो ...काहीच नाही.

कोणाशी काही देवाण घेवाणचं नाही, तर हे सगळे येणार कुठून? हा पठ्ठ्या दोन दोन दिवस तर नेट सुद्धा चालू करायचा नाही. नेट चालू झाल्यावर येणारा पोस्ट्सचा खच तो काही मिनिटात बाजूला सारायचा.... काही वाचून तर काही न बघता, न उघडता. ऑफिस मधेही याचा 'वेडे'पणा संपायचा नाही. सर्वांच्या जवळ जाऊन बोलायची याला भारी हौस. ऑफिसने कर्मचाऱ्यांना दिलेले चॅट एप्लिकेशन तो फक्त कामा पुरताच वापरायचा. माणसांशी प्रत्यक्ष बोलण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याला ऑफिसचे चौकीदार बोडके काकांच्या मुलीने संगणक शास्त्रात विशारद केल्याचं समजलं होतं. त्यासाठी मोबाईलवर पोस्ट शेयर करून अभिनंदन करायचे सोडून या वेड्याने बोडके काकांची गळाभेट घेऊन अभिनंदन केले होते. तेव्हा केवढे भावुक झाले होते काका. पण याला लोकांना असं रडवायची सवयच होती. त्याच्या या वेडाची कल्पना ऑफिस मधल्या सगळ्या चतुर्थ श्रेणी कामगारांना होती. या सवयीमुळे त्याचा डेस्क नेहमी न सांगता साफ व्हायचा, पिण्याचे पाणी, चहा कॉफी सर्व काही जागेवर यायचे. ऑफिसमध्ये त्याला भेटायला आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी चांगला व्हायचा. असेच एकदा ऑफिस मधल्या बर्वे मावशींच्या मुलीला मुलगी झाल्याचे कानावर आल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी घरून आईने पाठवलेले डिंकाचे लाडू आणून गुपचूप मावशींच्या हातावर देत "ताईला बाळ झालंय ना, तिला द्या" म्हणाला. ते बघून केवढा गहिवर दाटून आला होता त्या माऊलीच्या नजरेत, काय म्हणून सांगावा.

तो घरी दारी सारखाच वागायचा. सुट्टी झाल्यावर घरी आले की त्याचे सर्व मित्र लॅपटॉप, मोबाईल घेऊन तासंतास बसायचे. कोणी सोशल मिडीयातून मित्रांशी संवाद साधायचे, तर कोणी रोजच्या चहा, कॉफी किंवा जेवणाचे छायाचित्र पाठवून भरपूर लाईक्स मिळवायचे. त्यांची मित्र संख्या दिवसेंदिवस वाढत होती. हा मात्र रोज संध्याकाळी घरी आल्यावर कपडे बदलून खाली सोसायटीच्या बागेत जायचा. मिळेल त्या वयाच्या मुला माणसां सोबत खेळायचा. फिरायला आलेल्या सत्तरीतल्या तरुणां सोबतही त्याची खूप गट्टी जमायची. या वर्गाची दुःखं काहीशी वेगळी असतात, याची चांगली जाण त्याला खूप लवकर आली होती. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, खिदळायचा, त्यांच्या सुख दुःखाची चौकशी करायचा. ती म्हातारी माणसं त्याला बऱ्याचदा तो त्याच्या वयाच्या मुलांसोबत का रहात नाही, म्हणून विचारायची, तो त्यांना फक्त मिश्किल स्मित देऊन विषय टाळायचा. तो निघून गेल्यावर त्याच्या पाठीमागे तीच माणसे त्याला प्रेमाने 'वेडा' म्हणायची. त्याला येणारे मैदानी खेळ बागेतल्या छोट्या मुलांना शिकवताना त्या मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांच्या देखील तो ओळखीचा झाला होता.

त्याला आता सोसायटीत अडीच तीन वर्ष झाली होती. नेहमी तरुण पुरुष भाडेकरूंच्या नावाने ओरडा करणारी तोंडे हळू हळू शांत झाली होती. एकदा असाच खेळताना पाय मुरगळला म्हणून त्याने सकाळच्या व्यायामाला दांडी मारली, संध्याकाळी देखील त्याला बागेत जाणे जमले नव्हते. डॉक्टरांनी चार दिवस पूर्ण आराम करायला सांगितले होते. एव्हाना आपल्या लाडक्या दादाच्या दुखण्याची बातमी चिल्ल्या पिल्ल्यांनी अख्ख्या सोसायटीत पसरवली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घरात एकटा असताना दारावरची घंटी वाजली, म्हणून हळू हळू चालत जाऊन त्याने दरवाजा उघडला, तर दारात शिंदे आजी आणि पवार आजी उभ्या होत्या. शिंदे आजींनी त्याच्या पायासाठी लेप बनवून आणला होता. दरवाजा उघडताच "काय रे पोरा, एवढं लागलं तर सांगायचं नाही का?" म्हणून प्रश्नांच्या फैरी झाडत दोघी घरात शिरल्या. त्याच्या परवानगीची वाट न पहाता त्याला बसायला लावून त्याच्या पायावर सोबत आणलेला लेप लावला. तुम्हाला कसं समजलं म्हणून विचारलं तर अगदी तिखट आवाजात शिंदे आजींनी "अरे पोरा, बागत तू येईना म्हणून आमचे म्हातारे बी घर सोडीनात, त्यांच्या बडबडीच्या जाचा पायी तुला हुडकीत आले" अशी बतावणी केली. त्यांचे उत्तर ऐकताना त्याच्या गालावर छानसं हसू आलं होतं. लेप लावून होई पर्यंत घरात गर्दी वाढतच गेली. शिंदे, पवार आणि जोशी आजोबा, गफूर चाचा, नायर आंटी, प्रमिला काकू, चिल्ली पिल्ली गँग आणि अजूनही बरेच जण आले होते. ऑफिस सुटून मित्र घरी पोहोचले तेव्हा घरात बसायला देखील जागा शिल्लक नव्हती. आपल्या मित्राची सोसायटीत इतकी ओळख असेल, याची जरा सुद्धा कल्पना त्यांना नव्हती.

*त्याचे मित्र "फ्रेंड्स लिस्ट" वाढवत होते तेव्हा हा माणसे जोडत होता. त्याचे मित्र आभासी दुनियेत रममाण व्हायचे तेव्हा हा 'वेडा' खऱ्या खुऱ्या दुनियेत फिरायचा.*

त्याच्या मित्रांना लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकांशी "टच" मधे रहायला आवडायचे, याला मात्र लोकांना *"स्पर्श"* करायला आवडायचे.

तो लोकांच्या मनाला *स्पर्श* करायचा, त्यांच्या भावनेतील ओलावा जपायचा. कधी त्यांच्या घरात, तर कधी आयुष्यात डोकवायचा, त्यांच्या मनात आणि आठवणीत घर करून राहायचा. आज घरात आणि घराबाहेर जमलेली गर्दी म्हणजे त्या वेड्याने जोडलेली माणसे होती. *केवळ स्पर्शाने माणूस इतका श्रीमंत झाल्याची उदाहरणे तशी विरळच.*

एवढ्या घाईत पवार आजींनी त्याला लवकर बरा होण्यासाठी फर्मान काढले आणि पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या त्यांच्या नातीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं...

"आज प्रत्येकाच्या ठायी असे स्पर्शाचे असे वेड जपण्याची गरज वाढत चालली आहे व आपापसातील संवाद कमी व वादच जास्त वाढत चालले आहेत तरी प्रत्येकाने जाणीवपूर्वक रोज एका लहान मुलाशी व एका वयस्कर माणसाशी संवाद साधायला हवा.मुलांशी बोलताना आपण लहान होतो व चार चांगल्या गोष्टी त्याला हक्काने सांगता येतात व वयस्कर माणसाशी संवाद साधल्यावर त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकता येते. हि गोष्ट रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुमच्या दैनंदिनीत समाविष्ट करा.

जीवन खुपच सुंदर असते, आहे, ते आनंदात जगा, *"वेडे"* होऊन जगा...!!"...

👌👌👌👌👌👌👌

Saturday, 21 November 2020

शिक्षक

 *शिक्षक*


(समस्त शिक्षकांना अर्पण....)


हल्ली सोशल मीडियावर

    शिक्षकाची टर उडविली जाते,

विद्यार्थी जोमात,शिक्षक कोमात

   असे सर्रास म्हटले जाते.


ज्या शिक्षकाने तुम्हाला लिहायला

    - वाचायला शिकविले

त्या शिक्षकाला कोमात पाठवितांना

      तुम्हाला काहीच कसे नाही वाटले ?


शाळेला असते प्रथम प्राधान्य

   कुटुंबाला दुय्यम,

हल्ली वर्गात जातांना पाळावा

   लागतो संयम


छडी लागे छमछम चा

   काळ मागे गेला,

माझ्या मुलाला शिक्षा का केली?

   पालक तक्रार करू लागला.


हल्ली मुलांना शिस्त लावणे 

  झाले आहे खूप कठीण,

शिक्षकाविषयी आदरभाव मुलांना

  असावा लागतो आतुन.(मनापासून)


सण,उत्सव,सेलिब्रेशन यात

  अध्यापन मागे पडते,

अभ्यासक्रम पुर्ण करण्याची (शिक्षकाची)

तळमळ विद्यार्थ्याला कुठे कळते?

 

गुरुजी गेले,मास्तर गेले,

    मॅडम आणि सर आले,

काळाच्या ओघात विद्यार्थ्यांचे

   विचार मात्र बदलू लागले.


सामाजिक जीवनातही शिक्षक 

   भान ठेवून वागतो,

शिक्षक हा नेहमीच मर्यादेचा

   महामेरू असतो.


हाडाचा शिक्षक आहे मी,

    मोडेल पण वाकणार नाही,

कितीही अडचणी आल्या तरी,

   अध्यापन कधी सोडणार नाही.


पिढ्यानपिढ्या सुशिक्षित करण्याचे अविरत काम चालु आहे,

 मी एक शिक्षक असल्याचा 

     मला खुप अभिमान आहे.


सौ. प्रियंका पंचभाई.

(कृपया शेअर करताना नावानिशी शेअर करावे.)


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Friday, 23 October 2020

वांझ

*वांझ*


लेखिका- सुहासिनी.


    लग्नाला चाळीस वर्षे झाली होती. पण आज तिने त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रु पाहिले होते. तो हळव्या स्वरात तिला सांगु लागला, "आयुष्यभर कष्ट करुन, घाम गाळून, जे घर उभे केले, ज्या घराचा प्रत्येक कोपरा ह्या हातांनी सजवला, ते घर सोडून येतांना काही नाही वाटले, त्या घराचा उंबरठा नेहमीसाठी सोडून येतांनाही काहीच नाही वाटले गं..!

पण... पण... वृद्धाश्रमाची पहिलीच पायरी चढताना *वांझ* असल्यासारखे वाटले..."

    ती त्याच्याकडे खिन्न नजरेने बघतच राहिली. पापणी न हालवता. त्याने स्वतःला सावरले आणि पुढे म्हणाला... "सुनिता, मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना गं?"

     तिने बस् होकारार्थी मान हालवली... (मनात उदासीनता होती थोडी त्याच्या आणि थोडी तिच्याही)

    त्याने पुन्हा विचारले, "तुझा माझ्यावर विश्वास आहे ना गं?"

     हे वय राहिले नव्हते कष्ट करण्याचे पण, त्याला पुन्हा शुन्यातुन विश्व निर्माण करायचे होते. स्वाभिमान दूखावला गेला होता त्याचा.

     त्याच्या खांद्यावर डोके हलकेच टेकत, त्याला सावरत, "हो" म्हणाली ती.

उद्याचा दिवस वेगळा असेल...

    *वांझ*. घरात वाद सुरु होता. वैभव व सुनिता दमले होते पण तुषार बोलतच होता, "बाबा तुम्ही मला शिकवले, माझे उत्कृष्टरीत्या संगोपन केले, मान्य! पण ते तुमचे कर्तव्यच होते.

     तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्यामागे तुमचा स्वार्थ होता. मी मोठा होईन, तुम्हाचा सांभाळ करेन हा स्वार्थ होता. पण मी तुमची वृद्धाश्रमात रहाण्याची सोय केली. महिन्यातुन एकदा मी तुम्हाला पैसे पाठवत जाईन...

     मला याचा काहीच फायदा नाही. आणि हो, म्हणूनच ते माझे कर्तव्य ही नाही. पण, ह्या वयात मी तुम्हाला माझ्या घरातुन बाहेर काढले तर. मला काळजी आहे समाज काय बोलेल ह्या पेक्षा, तुम्ही काय खाल, कसे राहाल, कोठे वास्तव्य कराल? ह्या सर्व गोष्टींचा विचार करुनच मी हा निर्णय घेतला आहे.

    उगाच महिन्यातुन, पंधरा दिवसातुन होणारी वादावादी तरी टाळली जाईल, आणि अजयला हे नाही आवडत. आणि अमर पण आता मोठा होतोय. त्याच्या बालमनावर आपल्या भांडणाचा आणि तुमच्या नियमांच्या साखळीत अडकून रहाण्याने वाईट परिणाम होईल.

    आणि आम्हाला ही आता आमच्या पद्धतीने जीवन जगायचे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुमची परवानगी घ्यायची. मग तुम्ही विरोध करणार. मग वाद होतात... 

    नको हे आता, बस्स करुया... तुमची अडचण होते आम्हाला. तुम्हाला निघायला हवं. आमच्याकडे बघुन नाही, पण अमर कडे बघुन तरी..."

     हे एका दमात बोलला तुषार सारे काही. पण वैभव आणि सुनिताचा मात्र श्वास कोंडला होता.

    त्या रात्री दोघेही जेवले नाहीत. झोप ही नाही लागली त्यांना. बॅग पॅक करुन ते बस्स अंधाराकडे घाबरुन बघत होते. पण अंधारातुन कधीतरी पहाट होणारच ना...!

     तो उजेड कधी येऊच नये... अंधार असाच रहावा... आपले घर सुटू नये असेच वाटत होते वैभव आणि सुनिताला. 

     पण उजेड झाला... वृद्धाश्रम ही पाहिले. वृद्धाश्रमा पर्यंत सोबत तुषार ही आला होता. वृद्धाश्रमाची पहिली पायरी चढणार तेवढ्यात तुषार म्हणाला, "बरं आई बाबा, आजपासून घरी फोन करत जाऊ नका. नाहीतर अमरला तुमची सारखी आठवण येत राहील. लहान आहे तो अजून. आणि अजयला ही हे आवडणार नाही...

    आणि घरी यायचा हट्ट नका करु. मी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी नविन कपडे आणि मिठाई पाठवत जाईन."

    बस्स् इतकंच बोलला तुषार जाता जाता. वैभव आणि सुनिता मात्र काहीच बोलले नाहीत, ते बस्स बघत राहिले त्याच्याकडे. डोळ्यात आसवे इतकी दाटली होती की तुषार पाठ फिरवुन कधी निघून गेला हे ही समजले नाही...

    एक प्रश्न मनात थैमान घालत होता. मुले जन्माला का घालतो आपण...? पालकांनी जे त्यांच्यासाठी कले ते *'कर्तव्य'* पण तेच जर पाल्यांनी पालकांसाठी केले तर ते *'उपकार'?*

     झाडाला मुळांचे ओझे होते हेच खरे, मुळांना मात्र झाडाचे ओझे कधीच होत नाही. थोडीशी मुळे डगमगली की झाड लगेच कोसळून पडते. पण झाडाचे मात्र इतके ओझे घेऊन ही तसेच खंबीरपणे उभे असते...

     दोघांचे ही हृदय गेले आठ दिवस खुप जड वाटत होते. गेल्या आठ दिवसात त्यांना तीव्रपणे जाणवले होते की आपण शरिराने म्हातारे झालोय. पण वैभव आणि सुनिताने आशा सोडली नव्हती...!

    त्यांनी वृद्धाश्रम सोडण्याचा निर्णय घेतला. वृद्धाश्रमातुन बाहेर पडताना खुप मोकळे मोकळे वाटत होते दोघांनाही. पण वैभव ने खुप चांगली माणसे जोडली होती.

     तरुण असतांना जणू तो हरीश्चंद्रच होता. सुनिता मात्र सारखी भांडायची. तो दानशूरपणा नव्हता आवडत तीला. पण तेव्हा केलेली मदत आता मात्र उपयोगी पडली. बस् आता निघायचे बाकी होते.

    निघण्याआधी तुषारला फोन केला. हळूवार आवाजात वैभव बोलू लागला, "हॅलो तुषार बेटा, मी बोलतोय"

     पलिकडून तुषार म्हणाला, "हो बाबा, बोला लवकर. कामं आहेत खुप इकडे."

     वैभवने बोलायला सुरुवात केली, *"बाळ, तु म्हणालास की मी तुझ्यासाठी जे केले ते माझे कर्तव्य होते. पण तु जे माझ्यासाठी करतोस ते उपकार. बेटा तुला असे का वाटते की तु आहेस म्हणून मी आहे. बाबा होतो तुझा. मी आहे म्हणून तु आहेस. आणि हो, आजपासून तु वृद्धाश्रमात उपकार म्हणून किंवा भिक म्हणून जे पैसे पाठवतोस ते नको पाठवू आजपासून. आम्ही वृद्धाश्रम सोडून चाललोय. आम्ही मान्य केलेय, आम्ही वांझ आहोत. आम्हाला कोणी मुलगा नाही. जमले तर तुही तुझ्या नावातुन माझे नाव आणि आडनाव काढून टाक."* इतकेच बोलुन त्याने फोन ठेवला... एक नजर सुनिताकडे पाहिले. नाराज होती पण नवऱ्याचा आज जास्तच आभिमान वाटत होता.

    दोघांनी एकमेकांचा हात पकडला व निघून गेले नव्या भविष्यात. पण मागे सोडून गेले एका शब्दात असणारा प्रश्न... उत्तर आणि अर्थ बदलून गेलेला... तो

 *वांझ*


*--- सुहासिनी.*

(कृपया शेअर करतांना मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)

*C/P.*

Friday, 18 September 2020

रक्षा अनुसंधान व विकास संघठन(DRDO) द्वारा मिशन शक्ती अंतर्गत कार्यक्रमाबाबत

 *रक्षा अनुसंधान व विकास संघठन(DRDO) द्वारा मिशन शक्ती अंतर्गत कार्यक्रमाबाबत*


🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀



नंदुरबार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील  विज्ञान शिक्षकांना सुचित करण्यात येते की,रक्षा अनुसंधान व विकास संघठन(DRDO)द्वारा क्षेपणास्त्र रोधक(Anti-Missile Test)चाचणी दि. २७ मार्च २०१९ रोजी घेण्यात आली.अनेक तांत्रिक आव्हानांचा सामना करीत अतिशय कमी वेळात भारतीय शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी केली.ही क्षमता असणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.

    भारतीय शास्त्रज्ञांची ही कामगिरी ७ ते १४ वयोगटातीलविद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांची विज्ञान व तंत्रज्ञानातील रुची वाढावी याकरिता रक्षा अनुसंधान व विकास संघठन(DRDO) तर्फे हिंदी व इंग्रजी भाषेतील एक छोटी पुस्तिका(E-book) स्वरूपात तसेच सुमारे १५ मिनिटांची डॉक्युमेंटरी इंग्रजी,हिंदी, मराठी व इतर भाषेतही  तयार करण्यात आली आहे.



🧫🧫🛰️🛰️🛰️🛰️🧫🧫

  

*डॉक्युमेंटरीआणि पुस्तिका(E-book) -https://www.drdo.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.*



तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत सदर डॉक्युमेंटरी व पुस्तिका पोहचवावी.


🔭📕📗📘📙📕📗📘🔭



                    *प्राचार्य*

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था* 

                 *नंदुरबार*

                    

यांच्या आदेशान्वये.

Wednesday, 9 September 2020

शिक्षक दिनानिमित्त माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन

 

शिक्षक दिनानिमित्त माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन



*राष्ट्रीय विज्ञान दिन* दरवर्षी 28 फेब्रुवारीला

भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो याचे कारण 28  फेब्रुवारी हा दिवस भारतीयांना अभिमान वाटावा असा आहे डॉ.  सी .व्ही. रामन यांना ...