*रक्षा अनुसंधान व विकास संघठन(DRDO) द्वारा मिशन शक्ती अंतर्गत कार्यक्रमाबाबत*
🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील विज्ञान शिक्षकांना सुचित करण्यात येते की,रक्षा अनुसंधान व विकास संघठन(DRDO)द्वारा क्षेपणास्त्र रोधक(Anti-Missile Test)चाचणी दि. २७ मार्च २०१९ रोजी घेण्यात आली.अनेक तांत्रिक आव्हानांचा सामना करीत अतिशय कमी वेळात भारतीय शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी केली.ही क्षमता असणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.
भारतीय शास्त्रज्ञांची ही कामगिरी ७ ते १४ वयोगटातीलविद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांची विज्ञान व तंत्रज्ञानातील रुची वाढावी याकरिता रक्षा अनुसंधान व विकास संघठन(DRDO) तर्फे हिंदी व इंग्रजी भाषेतील एक छोटी पुस्तिका(E-book) स्वरूपात तसेच सुमारे १५ मिनिटांची डॉक्युमेंटरी इंग्रजी,हिंदी, मराठी व इतर भाषेतही तयार करण्यात आली आहे.
🧫🧫🛰️🛰️🛰️🛰️🧫🧫
*डॉक्युमेंटरीआणि पुस्तिका(E-book) -https://www.drdo.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.*
तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत सदर डॉक्युमेंटरी व पुस्तिका पोहचवावी.
🔭📕📗📘📙📕📗📘🔭
*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
*नंदुरबार*
यांच्या आदेशान्वये.
No comments:
Post a Comment