भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो याचे कारण 28 फेब्रुवारी हा दिवस भारतीयांना अभिमान वाटावा असा आहे डॉ. सी .व्ही. रामन यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला .त्यांचा
*रामन इफेक्ट* हा शोध सादर करण्याचा दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी त्यांची ही कृती कायम भारतीयांनी लक्षात ठेवावी म्हणून हा दिवस *राष्ट्रीय विज्ञान दिन .* रामन इफेक्ट या संशोधनातील महत्त्वाचे निरीक्षण 28 फेब्रुवारी रोजी पहाटे झाले . *1986* सालापासून भारतभर हा दिवस विविध वैज्ञानिक कार्यक्रमाद्वारे साजरा केला जातो .
एकाच रंगाचे प्रकाशकिरण विविध पदार्थांमधून नेले असता त्यांच्या लांबीत फरक पडतो . हा फरक विविध पदार्थामध्ये असणाऱ्या रेणूंमुळे होतो शिवाय तो प्रकाश किरण आणि माध्यम यात ऊर्जेची देवाण घेवाण होते . असं संशोधन रामन यांनी केले होते गणित पद्धतीत मांडले यालाच " *रामन परिणाम "* म्हणतात . त्यांच्या शोधामुळे हजारो रसायनांची संरचना समजली . 1928 साली त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वैज्ञानिकांना या संशोधनाचे महत्त्व लक्षात आले आणि म्हणूनच 1930 साली त्यांना *नोबेल पुरस्काराने* गौरवण्यात आले .
स्वातंत्र्यपूर्व काळातील *रामन,* *रामानुजन , सत्येंद्रनाथ* *बोस, मेघनाथ* *साह , होमी भाभा* यांनी लावलेले शोध त्याच्या संशोधकाच्या नावाने प्रसिद्ध झाले .स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञानप्रेमी पंतप्रधान नेहरू, राजीव गांधी यांच्या प्रेरणेने होमी *भाभा भटनागर राजा रामण्णा ,* *सतीश धवन , यू आर* *राव . जयंत नारळीकर डॉ.* *वसंत गोवारीकर आणि डॉ.* *ए.* *पी *.जे.* *अब्दुल** *कलाम अशा* समर्थ शास्त्रज्ञांच्या नेतृत्वामुळे देशात विज्ञान संस्थेचे जाळे पसरले .या शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळे आपण सर्वच क्षेत्रात भरारी घेऊन *महासत्ता* होण्याच्या पथावर आहे .भारतीय विज्ञानाचा आढावा घेतला तर विज्ञान जगतात *पाच* विशेष गोष्टी उल्लेखनीय आहेत त्या म्हणजे *मंगळयान , GSLV मार्क 1 ,* *GSLV मार्क 2 , व्हीट जिनोम* *सिक्वेन्स , परमाणू क्षेत्र* *उपलब्धता INS अरिहंत* *पाणबुडी* त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने नावलौकिक प्राप्त केला आहे .
विज्ञानरूपी ज्ञान कधीही थांबत नाही . सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी *अन्न वस्त्र निवारा* यांच्या बरोबर *विज्ञानाची* गरज आहे .विद्यार्थ्यांनी फक्त *इंजिनीअर , डॉक्टर , आर्किटेक्ट* अशा स्वरूपाच्या झटपट श्रीमंतीच्या शाखांऐवजी *विज्ञान व संशोधनामध्ये रस* घ्यावा व पालकांनी सुद्धा मुलांची मानसिकता तयार करावी . संशोधकाला त्याच्या आवडीचे काम करता येते . इतर नोकऱ्यामध्ये हे जमत नाही संशोधकांच्या संशोधनाचा समाजाला निश्चितच फायदा आहे . ज्ञानमय , विज्ञानमय व्यक्तींचा समाजात सन्मान होतो ही व्यक्ती सर्वत्र आदरणीय बनते .
आज देशासमोर *हवा , पाणी* व *जमीन यांचे प्रचंड* *प्रदूषण , तापमान वाढ ,* *जमिनीची धूप जंगलांचा* *-हास ,बेबंद शहरीकरणाच्या* *समस्या . स्त्रीभ्रूण हत्या ,* *भविष्यातील इंधनाची कमतरता* *वाढत्या लोकसंख्येला* *लागणारे* *अन्नधान्य व पाणीसमस्या व पाणी* *प्रदूषण* अशा विविध संकटांनी ग्रासला आहे भविष्यात या समस्या तीव्र होणार आहेत या समस्यांचे निराकरण फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे करता येणार आहे . *विज्ञानाला व विज्ञान* *संशोधनाला पर्याय नाही* हे महत्त्व विविध स्तरावर पटवून समाजात *विज्ञान विषयक* *जाणीव* वाढविण्यासाठी विज्ञानदिन साजरा केला जावा .
साै. विजया राजेंद्र जाधव
छ. शिवाजी विद्यालय
दुधोंडी ( पलूस)
No comments:
Post a Comment