Wikipedia

Search results

Wednesday, 9 September 2020

शिरीषकुमार यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

 9 सप्टेंबर - हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन


 पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्‌वेनियरने १६६० ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. ऐन-ए-अकबरी (इ.स. १५९०) मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले आणि सुबक घरांनी सजलेले शहर असा आहे.


नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. १९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्‌' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.


नहीं नमशे, नहीं नमशे !

महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना "चले जाव'चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्‌'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, "गोळी मारायची तर मला मार!'. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्‍यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.


*शिरीषकुमार यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन*💐💐💐


विकास पाटील

अध्यक्ष

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ

Friday, 31 July 2020

आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त

लोकमान्य टिळक पुण्यतिथी 

नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिरात दहावीच्या परीक्षेत पहिली व केंद्रात तिसरी

Click here
हिरल मनोज मगरे हिने 94.40% मिळून नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिरात इयत्ता दहावी मार्च 2020 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच गौरव पतिंग पाटील 94 टक्के मिळवून द्वितीय व विनीत नरेंद्र मोराणकर याने 93.60 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविले.

Wednesday, 29 July 2020

तुझ्यासारखीच झाले आता मी ही...🌹❤️

तुझ्यासारखीच झाले आता मी ही...🌹❤️

सिल्क ची साडी महाग आहे 
म्हणून तिथेच ठेवून द्यायचीस तू आई,
पण पाहुण्यांसाठी महागडे कप मात्र जमवत रहायचीस.
तुझ्या काटकसरीचे किस्से बनवून ,
आम्ही तुला खुप हसायचो आई...
सणासुदीला पाहिलेच नाही तुला कधी
सगळ्यांबरोबर बसून आनंद वाटून घेताना.
तू तर कायम स्वयंपाकघरातच असायचीस
काहीनाकाही तयारी करीत ...

तेंव्हा कायम मला वाटायचे
की तुला आयुष्य जगायचे कसे 
ते समजतच नाही आई
पण आता अनुभवते आहे मी
की जबाबदारीच्या छिद्रांमधून
गळून जातात सगळे हास्य विनोद

कधी वेळ काढून नटताना पाहिले नाही तुला,
चिडचिडच करीत राहिले मी
तुझ्या घाई आणि गडबडीवर,
कशी गरम कढईवर हात भाजून घेतेस अजून?
वाईट दिसतात ग त्या भाजल्याच्या खुणा हातावर..
पायांना भेगा पडल्या आहेत तुझ्या
थोडी तरी काळजी घे स्वत:ची
भाजी, भाजी कटर ने कापत नाहीस;
बोटांवरच्या त्या सुरीच्या खुणा
चांगल्या नाही वाटत...
बेंटेक्स वापरू नकोस ग...
तुझ्या या सगळ्या निष्काळजीपणावर बोलून
लाजवत होते मी तुला...

पण आता धुराच्यामधे उभे राहून काम करताना
समजायला लागले आहे सगळे
स्त्री हरवून बसते आपल्या जाणिवा, सौंदर्य, नटणे
आवडी निवडी आणि वय
आपल्या कुटुंबाचा आत्माच स्वत:त धारण करताना...
मी जेंव्हा ओल्या केसांनीच स्वयंपाकघरात शिरते
तुझ्यासारखीच वाटायला लागते अगदी
तुझ्यासारखीच टाळ्या वाजवून देवांना उठवते, 
तुझ्यासारखीच जागते...

सगळे ऋतू...
सणवारांची तयारी करत निघून जातात...
स्वयंपाकघर, गच्ची, आंगण सगळीकडे
फिरत रहाते काम उरकत
आणि संध्याकाळी थकल्यावर दमून गेल्यावर 
अगदी तुझ्यासारखी दिसायला लागते
डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसली आहे
असे आठवतच नाही किती दिवसांत...
तुझ्यासारखीच फिकट नि:सत्व झाली आहे मी पण आई

कोणी मैत्रिण तिच्या स्नेहाने जेंव्हा
माझ्या मनावर शिंपण घालते ना आई
क्षणभर त्या प्रेमात तूच दिसू लागतेस मला
तुला दुरावूनही कधी माझ्यात 
तर कधी जवळच्या नात्यांमधे 
तुला शोधत रहातेच मी आई...
माझी आई...🌹❤️

जिल्ह्यात ३१ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत असे तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार दुकाने!- जिल्हाधिकारी*

*
By Jagdish Thakur (Journalist)  July 29, 2020
आठ दिवसांच्या संचारबंदीचा उद्या अखेरचा दिवस

नंदसत्ता न्युज नेटवर्क
नंदुरबार- जिल्ह्यातील  चार शहरांमधील आठ दिवसांच्या संचारबंदीचा उद्या गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने सदरच्या संचारबंदीत काही शिथिलता देऊन सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३१ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत असे तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहार व दुकाने सुरू ठेवण्यास पूर्वीप्रमाणे परवानगी राहणार आहे. त्यानंतर सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुबा राहील. परंतु त्यासाठी नियमांचे पालन व अटी लागू असतील. नंदुरबार शहादा तळोदा व नवापूर या चार शहरांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मागील काळात दिलेल्या आदेशाप्रमाणे मुभा दिलेली दुकाने सुरू राहतील. तर प्रत्येक रविवारी लागू केलेली कडक संचारबंदी कायम असेल. तसेच अक्कलकुवा धडगाव तालुक्यात सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता नागरिकांनी स्वॅब देण्यासाठी पुढे यावे. यासाठी प्रशासनाकडून दोन मोबाईल स्वॅब पथक नंदुरबार शहरासाठी तयार करण्यात येणार आहे. तालुका निहाय देखील स्वॅब घेण्याचे पथक तयार करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी

नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी, कोणकोणते बदल?
http://dhunt.in/aqvEH?s=a&ss=pd
Source : "TV9 मराठी" via Dailyhunt

अॅप डाउनलोड करा
http://dhunt.in/DWND

*राष्ट्रीय विज्ञान दिन* दरवर्षी 28 फेब्रुवारीला

भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो याचे कारण 28  फेब्रुवारी हा दिवस भारतीयांना अभिमान वाटावा असा आहे डॉ.  सी .व्ही. रामन यांना ...