*शिक्षक*
(समस्त शिक्षकांना अर्पण....)
हल्ली सोशल मीडियावर
शिक्षकाची टर उडविली जाते,
विद्यार्थी जोमात,शिक्षक कोमात
असे सर्रास म्हटले जाते.
ज्या शिक्षकाने तुम्हाला लिहायला
- वाचायला शिकविले
त्या शिक्षकाला कोमात पाठवितांना
तुम्हाला काहीच कसे नाही वाटले ?
शाळेला असते प्रथम प्राधान्य
कुटुंबाला दुय्यम,
हल्ली वर्गात जातांना पाळावा
लागतो संयम
छडी लागे छमछम चा
काळ मागे गेला,
माझ्या मुलाला शिक्षा का केली?
पालक तक्रार करू लागला.
हल्ली मुलांना शिस्त लावणे
झाले आहे खूप कठीण,
शिक्षकाविषयी आदरभाव मुलांना
असावा लागतो आतुन.(मनापासून)
सण,उत्सव,सेलिब्रेशन यात
अध्यापन मागे पडते,
अभ्यासक्रम पुर्ण करण्याची (शिक्षकाची)
तळमळ विद्यार्थ्याला कुठे कळते?
गुरुजी गेले,मास्तर गेले,
मॅडम आणि सर आले,
काळाच्या ओघात विद्यार्थ्यांचे
विचार मात्र बदलू लागले.
सामाजिक जीवनातही शिक्षक
भान ठेवून वागतो,
शिक्षक हा नेहमीच मर्यादेचा
महामेरू असतो.
हाडाचा शिक्षक आहे मी,
मोडेल पण वाकणार नाही,
कितीही अडचणी आल्या तरी,
अध्यापन कधी सोडणार नाही.
पिढ्यानपिढ्या सुशिक्षित करण्याचे अविरत काम चालु आहे,
मी एक शिक्षक असल्याचा
मला खुप अभिमान आहे.
सौ. प्रियंका पंचभाई.
(कृपया शेअर करताना नावानिशी शेअर करावे.)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment